• 2 years ago
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी शासकीय कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन ९५ टक्के सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई आहे’, असं वक्तव्य केलं. जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीवर ठाम असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना उद्देशून संजय गायकवाड यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांचं हे विधान सध्या वादात आलंय. तसंच या वक्तव्यानंतर संजय गायकवाड यांना चांगलाच टीकेचा सामना करावा लागत आहे. अशातच संपकरी कर्मचाऱ्यांवरील केलेल्या वक्तव्यावर संजय गायकवाडांनी आता यूटर्न घेतलाय.

#SanjayGaikwad #GovernmentEmployees #OldPensionScheme #Buldhana #Strike #Shivsena #Andolan #Maharashtra #EknathShinde #DevendraFadnavis

Category

🗞
News

Recommended