• last year
बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवाजी पार्कवर भव्य सभा पार पडली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंमुळेच शिवसेनेवर ही परिस्थिती ओढवली आहे, असं ते म्हणाले. दरम्यान, राज ठाकरेंच्या टीकेला आता खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत म्हणाले की मी त्यांचं भाषण ऐकलं नाही. सकाळी वाचलं, त्यांच्या पक्षाला 18 एक वर्ष होऊन गेली आहेत पक्ष वयात आला आहे. त्यांच्या पक्षाचे काय चाललंय मला माहित नाही. पण अठरा वर्षानंतर सुद्धा ते उद्धव ठाकरे यांच्यावरच बोलतात. उद्धव ठाकरे इतके मोठे नेते आहेत की एकनाथ शिंदे, नारायण राणे, भारतीय जनता पक्ष हे उद्धव ठाकरेंवरच बोलतात. स्वतः राज ठाकरे देखील उद्धव ठाकरेंवरती बोलतात. उद्धव ठाकरे यांची भीती सर्वांना वाटत आहे, असं राऊत म्हणाले.

#RajThackeray #SanjayRaut #UddhavThackeray #MNS #Shivsena #Shivtirth #Dadar #ShivajiPark #NarayanRane #BJP #EknathShinde #MahimDargah #Maharashtra

Category

🗞
News

Recommended