मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (रविवार) पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसातील राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची ही शिवतीर्थावरील तिसरी भेट होती. या भेटीवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान राज ठाकरे-मुख्यमंत्री भेटीवर ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी खोचक शब्दात टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांची मालेगावातील विराट सभा पाहून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघे एकमेकांचे अश्रू पुसण्यासाठी भेटले होते, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली.
#SanjayRaut #RajThackeray #EknathShinde #Shivsena #UddhavThackeray #Malegaon #BJP #MNS #AmitThackeray #Sabha #Maharashtra #HWNews
#SanjayRaut #RajThackeray #EknathShinde #Shivsena #UddhavThackeray #Malegaon #BJP #MNS #AmitThackeray #Sabha #Maharashtra #HWNews
Category
🗞
News