• 2 years ago
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीची चर्चा सुरू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांना भाजपाने प्रचंड त्रास दिला. तेच आता पंकजा मुंडे यांच्याबरोबर घडतंय, अशा आशयाचं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं. खडसे म्हणाले की “गोपीनाथ मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी त्यांना पहाटे चार वाजेपर्यंत वाट पाहावी लागली. त्यावेळी मी स्वत: त्यांच्याबरोबर हजर होतो. मधल्या काळात त्यांची इतकी छळवणूक झाली की, त्यांच्या मनात पक्ष सोडण्याचा विचार येत होता. पक्ष सोडून द्यावा, अशी स्थिती निर्माण झाली होती. तोच प्रकार आता पंकजा मुंडेंबरोबर सुरू आहे.” तर खडसेंच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

#PankajaMunde #EknathKhadse #DevendraFadnavis #GopinathMunde #Beed #BJP #Congress #NCP #GirishBapat #BypollElections #PuneLoksabha #PranitiShinde #VijayWadettiwar #Kolhapur #KMT #ManishSisodia #Gautam

Category

🗞
News

Recommended