• 2 days ago
Pune Crime Drunk Boy BMW VIDEO:मद्यधुंद अवस्थेत लघुशंका,अश्लील चाळे BMW कार मधून आलेल्या तरूणाचा माज

पुण्यात सध्या चाललंय काय असा प्रश्न विचारण्यासारखी घटना घडलीय. 

एकीकडे जग महिला दिन साजरा करतंय. तर दुसरीकडे पुण्याच्या शास्त्रीनगर चौकात भर सकाळी संतापजनक प्रकार घडलाय. पुण्यात मद्यधुंद तरूणाने भरचौकात अश्लील प्रकार केला. सिग्नलवर गाडी उभी करून गाडीच्या बाहेर येत त्याने लघुशंका केली... एमएच १२ आरएफ ८४१९ या रजिस्ट्रेशन नंबरच्या बीएमडब्ल्यू ६ सीरिज या लक्झरी गाडीतून आलेल्या तरूणाने श्रीमंतीचा माज दाखवत कोणताही विधीनिषेध न बाळगता भर रस्त्यात दिवसाढवळ्या लघूशंका केली... विशेष म्हणजे जाब विचारायला गेलेल्यांसमोरही त्याने हे विकृत कृत्य केलं... 


पुण्यातल्या धक्कादायक घटनांची पोलीस आयुक्तांना माहितीच नाही?  एबीपी माझाने विचारणा करताच 'माहिती घेऊन बोलतो' अशी सबब  भर चौकात तरूणाचं अश्लील कृत्य पोलीस आयुक्तांना माहितीच नाही?  कोथरूडमध्ये रस्त्यात तरूणाला बेदम मारहाण आयुक्तांना माहिती नाही?  पतीपत्नीवर धारदार शस्त्राने झालेला हल्ला आयुक्तांना माहिती नाही?  पुण्यातल्या गुन्ह्यांची माहिती पोलीस आयुक्तांना दिली जात नाही का?  दाम्पत्यावर हल्ल्याला १२ तास उलटले तरी आयुक्तांना माहिती नाही?

Category

🗞
News

Recommended