• 4 years ago
दीदींच्या गाण्यांचा "समग्र' संच (व्हिडिओ)
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सुमधुर गाण्यांचा अल्बम "सारेगम'ने बाजारात आणला आहे. "समग्र' असे अल्बमचे नाव असून, त्यामध्ये चित्रपटातील २३२ व बाहेरील ११३ गाण्यांचा समावेश आहे. भावगीते, भक्तिगीते, कोळीगीते, लावणी, आजोळ गीते अशी विविध प्रकाराची गाणी असून, दीदींच्या ३१ वर्षांचा सांगीतिक प्रवास या अल्बमच्या माध्यमातून चाहत्यांना अनुभवायला मिळेल. यशवंत देव यांनी अल्बम लॉंच केला. यावळी हृदयनाथ मंगेशकर व लता मंगेशकर उपस्थित होते.
व्हिडिओ पाहण्यासाठी क्‍लिक करा

Category

🗞
News

Recommended