नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अभिनेत्री सुजाता देशमुख घरात राहूनच व्यायामाला प्राधान्य देत आहे. रसिकांनीही घरात राहूनच व्यायाम करावा व स्वतःला तंदुरुस्त ठेवावे असे आवाहन तिने केले आहे. काकस्पर्श, तानी, असा मी तसा मी, अजब लग्नाची गजब गोष्ट, व्हेकेशन, कॅनव्हास यासारखे अनेक चित्रपट, या गोजिरवाण्या घरात, चार दिवस सासूचे, मंगळसूत्र, ओळख, स्मिताची गोष्ट, चिमणी पाखरं, टिकल ते पोलिटिकल यासारख्या विविध मालिका, व्यावसायिक नाटके यामध्ये अभिनेत्री सुजाता देशमुख यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
Category
🗞
News