लॉकडाऊनमध्ये शोधली संधी; ऊस रस विक्रीचा व्यवसाय करून बेरोजगारीवर केली मात

  • 3 years ago
करोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांना नोकरी गमवावी लागली. बेरोजगारीमुळे तरुणांना नोकरी शोधण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील राजेंद्र पवार या तरुणाने परिस्थितीवर मात करत स्वतःचा ऊस रस विक्रीचा व्यवसाय सुरु केला. ऊस रस विकण्यासाठी त्याने भंगारातून साहित्य जमा करून देशीजुगाड करून चारचाकी गाडी तयार केली. त्याव्दारे तो आपला छोटासा ऊस रस विक्रीचा व्यवसाया करून परिवाराची उपजीविका भागवत आहे. या तरुणाने देशीजुगाड करुन तयार केलेल्या चारचाकी गाडीची सध्या पाचोरा शहरात जोरदार चर्चा आहे.

Recommended