‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा पहिला सिझन प्रचंड गाजला होता. प्रेक्षकांच्या आग्रहाखातर त्याचा दुसरा सिझन आला. तोही आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सध्या एका व्यक्तिरेखेची जोरदार चर्चा आहे ती म्हणजे महेश आरवलेची. ही व्यक्तिरेखा आदिनाथ कोठारे याने साकारली असून त्याच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक होत आहे. 'सिटी ऑफ ड्रीम्स २'च्या निमित्ताने आदिनाथने लोकसत्ता ऑनलाइनच्या 'डिजिटल अड्डा'मध्ये हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये त्याने 'महेश साकारायला मिळणं हा सुंदर योगायोग' असे म्हटले आहे.
Category
😹
Fun