विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमीचे प्रख्यात नाट्यलेखक आनंद भीमटे यांचे 'गद्दार' हे नाटक आता पुस्तक रुपात येत आहे. प्रसिद्ध सिने अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते शंकरपूर येथे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी पद्मश्री परशुराम खुणे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विशेष म्हणजे 'गद्दार' या नाटकात मकरंद अनासपुरे यांची प्रमुख भूमिका असून या पुस्तक प्रकाशन सोहळ्या नंतर हे नाटक देखील सादर करण्यात आले. या वेळी मकरंद अनासपुरे यांनी झाडीपट्टी रंगभूमीचे जेष्ठ कलावंत परशुराम खुणे यांना मिळालेल्या पद्मश्री बद्दल आनंद व्यक्त करत या रंगभूमीचा मुख्य प्रवाहात समावेश व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
Category
🗞
News