पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर सर्वपक्षीय नेत्यांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे. गिरीश बापट यांच्या अंत्यदर्शनासाठी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील देखील दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पक्षाला काय दृष्ट लागलीय कोणास ठाऊक, पण एका मागोमाग एक घटना घडत आहेत, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. दरम्यान, गेल्या वर्षीच भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक, पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं दिर्घ आजाराने निधन झालं होतं.
Category
🗞
News