सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारवर परखड शब्दांत केलेल्या टिप्पणीवरून खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाने सरकारला नपुंसक म्हटले आहे. जे गेले काही महिने जनता सरकारबद्दल बोलते आहे. नपुंसक, बिनकामाचे अशा अनेक उपाध्या न्यायालाने लावल्या आहेत. यावरून या सरकारची पत काय आहे कळतं, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. राज्यात जातीय दंगली व्हाव्यात असं काम सरकार करत असून हे त्यांचं राजकारण आहे, असा आरोपही राऊतांनी केला.
Category
🗞
News