ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मोबाईल मेसेजवर जीवे मारण्याची धमकी आल्यामुळे खळबळ उडाली आहे. ही धमकी लॉरेन्स बिष्णोई गँगकडून आल्याचा उल्लेख मेसेजमध्ये करण्यात आला आहे. यासंदर्भात आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलंय “धमक्या येत असतात. पण विरोधकांना आलेल्या धमक्या सध्याचं सरकार गांभीर्यानं घेत नाही. सगळी सुरक्षा व्यवस्था गद्दार गटाचे आमदार, खासदार, पदाधिकारी यांच्यासाठी लावल्यामुळे महाराष्ट्रातली कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे ढेपाळली आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
Category
🗞
News