• 2 years ago
नंदुरबारमध्ये १ एप्रिलचे औचित्य साधून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात उपहासात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी "मोदींनी सामान्य नागरिकांना महागाई, बेरोजगारी आणि विकासाबाबत जे एप्रिल फुल बनवले" असं म्हणत केक कापून निषेध व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते #nandurbar #modi #modiji #rashtravadicongress #khandesh

Category

🗞
News

Recommended