Devendra Fadnavis: 'मी गृहमंत्री झाल्याने अनेक लोकांची..', देवेंद्र फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना टोला
छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या पूर्वसंध्येला झालेल्या जाळपोळ आणि हिंसाचार प्रकरणावरून राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. त्यावर आता देवेंद्र फडणवीसांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीस म्हणाले की, 'मला याची कल्पना आहे की मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे. अनेकांना मनातून असं वाटतंय की मी गृहमंत्री राहिलो नाही तर बरं होईल. मी त्या सगळ्यांना एवढंच सांगू इच्छितो की मी गृहमंत्री राहणार आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रीपदाचा कार्यभार दिला आहे. जे जे लोक चुकीचं काम करतील, त्यांच्यावर १०० टक्के कारवाई होईल. मी आजही सांगतो, मी कुणाला घाबरत नाही, कुणाला दबत नाही. जे कायदेशीर आहे तेच वागतो. कायद्यानंच राज्य चालेल

Category
🗞
News