• 2 years ago
संजय राऊतांना शुक्रवारी संध्याकाळी बिष्णोई गँगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज आल्यामुळे राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले की, “संजय राऊतांना धमकी देणाऱ्या माणसाची ओळख पटली आहे. प्राथमिक माहितीनुसार दारुच्या नशेत त्यानं अशी धमकी दिल्याचं समोर आलं आहे. पण ही प्राथमिक माहिती आहे. याबाबत संपूर्ण तपास केला जाईल आणि कुणीही धमकी दिली असेल तर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रात कुणीही कुणाला धमकी दिली, तरी सरकार आणि पोलीस शांत बसणार नाहीत. अशा कोणत्याही व्यक्तीवर कारवाई होईल”

Category

🗞
News

Recommended