• last year
गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीवरुन राजकारण होत आहे. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
“२०१४ साली नरेंद्र मोदी यांची पदवी पाहून लोकांनी निवडून दिलं होतं का? त्यांनी २०१४ साली स्वत:चा करिश्मा निर्माण केला होता. जो भाजपाचा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नव्हता. त्याचं सर्वस्व श्रेय नरेंद्र मोदींना दिलं पाहिजे. लोकशाहीत बहुमताचा आदराला महत्व आहे. देशात ५४३ खासदार ज्यांच्याकडे आहेत, तो पंतप्रधान होतो. तर, राज्यात १४५ चं बहुमत असेल तर तो मुख्यमंत्री होतो,” असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

Category

🗞
News

Recommended