• 2 years ago
ठाण्यात शिंदे गटाच्या काही कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचा दावा करण्यात आला आहे. यासंदर्भातलं एक सीसीटीव्ही फूटेजही सध्या व्हायरल होत आहे. यावर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत शिंदे गट आणि भाजपावर आरोप केले. यावर प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे नरेश म्हस्के म्हणाले की, 'भाजपा नेते चोर आहेत, डॉक्टर होण्यासाठी गद्दारी करावी लागते, एप्रिल फूल म्हणजे नरेंद्र मोदी अशा पद्धतीने सर्वच नेत्यांवर आक्षेपार्ह पद्धतीने ती महिला व्यक्त होत होती. त्या महिलेच्या खांद्यावर बंदूक ठेवून मातोश्री आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे हे आमच्या नेत्यांवर टीका करत असतात'

Category

🗞
News

Recommended