• 2 years ago
ऐतिहासिक क्षण; २०११ च्या विश्वचषक स्मारकाचं धोनीने केलं उद्घाटन | MS Dhoni

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने वानखेडे मैदानावर २०११च्या विश्वचषक विजयी स्मारकाचं उद्घाटन केलं. २०११ साली झालेल्या विश्वचषकात धोनीने विजयी षटकार मारत सामना जिंकला होता. ज्या स्टँड्सवर तो चेंडू पडला होता ती जागा विजयी स्मारक म्हणून घोषित करण्यात आली आहे. धोनीच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं. मुंबई क्रिकेट असोसिएशनने हा पुढाकार घेत धोनीच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे

Category

🗞
News

Recommended