शिंदे फडणवीस सरकारचे सर्व नेते आमदार व खासदार अयोध्या दौऱ्यावर गेले होते पण यात शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू नसल्याने संजय राऊत यांनी बच्चू कडू यांच्यावर नाराज असल्याची टीका केली होती. त्यावर बच्चू कडू यांनी मी नाराज नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 'सध्या आमच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने या कामात मी व्यस्त होतो, त्यामुळे अयोध्या दौऱ्यावर जाऊ शकलो नाही' अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली. 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कामामध्ये सनी देओल आहेत आणि अॅक्शनमध्ये नाना पाटेकर यांच्यासारखे दबंग आहेत,असे दबंग मुख्यमंत्री असल्यामुळे नाराज होण्याचं कारण नाही' असे वक्तव्यही यावेळी त्यांनी केले.
Category
🗞
News