नवी मुंबई येथील खारघरमध्ये ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने श्री सदस्य दाखल झाले होते. मात्र उष्मघाताच्या त्रासाने अनेकांना त्रास झाला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान ११ जणांचा मृत्यू झाला व २४ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत सरकारतर्फे जाहीर करण्यात आली आहे.
Category
🗞
News