नागपूरमधील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीद आंदोलनासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा पुन्हा समाचार घेत भाजपाला थेट आव्हानही दिलं. बाबरी मशीद आंदोलनावेळी शिवसैनिक नव्हते, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.
Category
🗞
News