विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार हे राज्य सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यात अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांच्या सह्यांचं पत्रच तयार असल्याचं वृ्त्त ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’नं दिल्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. यावर आता अजित पवार यांनी स्वत: पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
Category
🗞
News