• 2 years ago
Atiq Ahmed: “शहीद अतिक अहमद यांना भारतरत्न द्या”, काँग्रेस नेत्याची अजब मागणी | Bharat Ratna

कुख्यात गँगस्टर अतिक अहमदची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली. पोलिसांच्या ताब्यात असतानाच अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांवर गोळ्या झाडण्यात आल्या. अतिक हा एक माफिया होता, तसेच त्याच्यावर पोलिसांत १०० हून अधिक केसेस दाखल होत्या. याच अतिकला शहीद असा दर्जा देण्याची मागणी एका काँग्रेस नेत्याने केली आहे. तसेच अतिकला मृत्यूपश्चात भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणीदेखील केली आहे. ही विचित्र मागणी प्रयागराजच्या वॉर्ड क्रमांक ४३ (दक्षिण मलाका) मधून निवडणूक लढणारे राज कुमार सिंह उर्फ रज्जू यांनी केली आहे.
#atiqahmed #bharatratnaaward #rajkumarsingh #congress

Category

🗞
News

Recommended