• 2 years ago
कोणत्याही शैक्षणिक संस्थेचा दर्जा हा त्या संस्थेचे ग्रंथालय आणि त्या संस्थेचे माजी विद्यार्थी कसे आहेत? यावर ठरत असतो असं म्हणतात. मग यानुसार लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, गुरुदेव रानडे, वि. का. राजवाडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, सेनापती बापट, तात्यासाहेब केळकर अशा विविध क्षेत्रांमध्ये योगदान देणारे दिग्गज हे सर्व ज्या डेक्कन कॉलेजचे माजी विद्यार्थी होते ते महाविद्यालय कसं असेल? आज 'गोष्ट पुण्याची'च्या भागात २०० वर्षांहून अधिक शैक्षणिक परंपरा लाभलेल्या पुण्यातील याच डेक्कन कॉलेजला भेट देऊयात..

Category

🗞
News

Recommended