• 2 years ago
कोळी आणि आगरी समाजाचा समावेश पहिल्या मुंबईकरांमध्ये होतो. मात्र माणूस किंवा आदिमानव या मुंबईच्या भूमीवर येण्यापूर्वीही इथे काही सजीव राहात होते. त्यांचे ६५ दशलक्ष वर्षांपूर्वीचे पुरावे याच मुंबईमध्ये सापडले होते. या सजीवांमध्ये प्राणी आणि जीवजंतूंसोबतच झाडांचाही समावेश होतो. जुनी जीवाश्मे ही पाणवनस्पतींची आहेत. तर ३५ हजार वर्षांपूर्वीचे जीवाश्म हे तर एका जंगलाचेच आहे!

Category

🗞
News

Recommended