• last year
इंग्रजांची 'जागतिक गरज' म्हणून खरं तर मुंबईची सात बेटं एकमेकांना जोडली गेली. ती जोडली गेल्याशिवाय काम पुढे सरकणारच नव्हतं. ती जोडली गेली म्हणून रेल्वेचीही निर्मितीही झाली आणि भारतातील पहिला रेल्वेमार्ग अस्तित्वात आला. पण अर्थात हे सगळं काही भारतीयांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी निर्माण झालं नव्हतं. तर ती त्या काळातील इंग्रजांची गरज होती. त्यावर त्यांच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा पोसला जाणार होता. त्याचा थेट संबंध होता तो वस्रोद्योगाशी!
#गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #mumbai #knowyourcity #KYCMumbai

Category

🗞
News

Recommended