• last year
उदय पवार या तरुण उद्योजकाने टिंग टाँग (Ting Tong) हे अ‍ॅप सुरू केलं आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून तो तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचा प्रयत्न करतोय. अ‍ॅपवर रोजच्या दैनंदिन जीवनात गरजेच्या असलेल्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्लंबर, इलेक्ट्रीशन ते अगदी घरकाम करणाऱ्या बाई व कॅार्पोरेटमधील व्यक्तींनाही यामध्ये जोडण्यात आलं आहे. लोकांच्या आवश्यकतेनुसार त्या त्या क्षेत्रातील लोकांचे नंबर आणि माहिती या अ‍ॅपवर उपलब्ध करण्यात आली आहे. अ‍ॅपची रजिस्ट्रशेन फी दिवसाला १ रु. इतकी आहे. म्हणजेच एक रुपयात रोजगाराची संधी येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Category

🗞
News

Recommended