• last year
अभिषेक पर्वते हा जळगाव जिल्ह्यातील ता. जामनेर येथील युवक. २०१७ मध्ये त्याने आपलं कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं. पदवीच शिक्षण झाल्यानंतर PSI होण्याचं स्वप्न घेऊन तो पुण्यात आला. २०१८ मध्ये पूर्व परीक्षा पास पण मैदानी चाचणीचा सराव करताना खुबा सरकला. डॉक्टरांनी रिप्लेसमेंट करायला सांगितलं व यापुढे धावता येणार नाही असं म्हटलं. यातून सावरत नवीन सुरुवात म्हणून अभिषेकने व्यवसाय करायचं ठरवलं. २०१९ मध्ये त्याने मेन्स सलून सुरू केलं. पण कोरोनामुळे हा व्यवसाय बंद करावा लागला. व्यवसाय पुन्हा उभारी घेत असताना शेजारी बिल्डिंगचं बांधकाम सुरू असताना त्यात दुकान पडलं. सततच्या अपयशामुळे आणि आर्थिक नुकसानीमुळे नैराश्य आलेल्या अभिषेकने माघार घेतली नाही. प्रयत्न आणि मेहनत करत राहिला. आज ३ वेगवेगळे व्यवसाय अभिषेक यशवीरित्या सांभाळत आहे. स्पर्धा परिक्षेत अपयश आल्याने नैराश्यात गेलेल्या अनेकांसाठी अभिषेकचा हा प्रवास प्रेरणा देणारा आहे.

Category

🗞
News

Recommended