पुण्यामधील शनिपारच्या भागातून प्रवास करताना तुम्हाला जिलब्या मारुती हे मंदिर नक्की दिसलं असेल. तुम्हाला प्रश्नही पडला असेल की जिलबीसारख्या गोड पदार्थाच्या नावावरून का बरं एखाद्या मारूतीचं नाव ठेवलं असेल? म्हणजे गणपतीला मोदक आवडतो हे आपण ऐकलंय पण मारुतीला जिलेबी आवडते असं आपण आजवर तरी ऐकलं नाही. चला तर मग आज 'गोष्ट पुण्याची'च्या भागातून या मारुतीच्या नावामागचा इतिहास जाणून घेऊयात.
Category
🗞
News