• last year
तत्कालीन शूर्पापक (सोपारा) बंदरातून सुरू असलेल्या व्यापारावर नजर ठेवण्याच्या उद्देशाने जीवदानीच्या निरीक्षण स्थळाचा वापर झाला आणि तिथेच पहिली लेणी अस्तित्वात आली. लोणावळ्याजवळील भाजा लेणी ही महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेणी असे अभ्यासक आजवर मानत आले. मात्र नवीन अभ्यास असे सांगतो की, भाजा नव्हे तर जीवदानीची लेणी हीच महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेणी आहेत. जीवदानीची ही प्राचीन लेणीही मुंबईच्या गेल्या अडीचहजार वर्षांच्या इतिहासाची साक्षीदार आहेत.

Category

🗞
News

Recommended