गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी आंदोलनाचं नेतृत्त्व वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हाती घेतलं. एसटी कर्मचाऱ्यांनीही त्यांना आपला नेता मानलं. सदावर्ते यांच्या प्रत्येक भाषणात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांचं पहिलं टार्गेट फक्त आणि फक्त शरद पवार हे असायचे. पवारांच्या घरावर हल्ला होण्यापूर्वी केलेल्या अखेरच्या भाषणातही त्यांनी पवारांवरच जहरी टीका केली होती. पण सदावर्तेंना एवढा द्वेष का आहे, ठाकरे सरकार सोडून ते थेट पवारांवरच हल्लाबोल का करतात असा प्रश्न अनेकांना पडतो.. हेच समजून घेऊ या व्हिडीओतून..
Category
🗞
News