• 3 years ago
यंदा साताऱ्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार चांगलाच रंगलेला पाहायला मिळाला. ही स्पर्धा खास ठरली ती कोल्हापूरसाठी. कारण कोल्हापुरचा पृथ्वीराज पाटील यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. पृथ्वीराज पाटीलने मानाची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. पृथ्वीराजने थरारक झालेल्या अंतिम सामन्यात विशाल बनकरवर मात केली. यंदाच्या महाराष्ट्र केसरीसाठी कोल्हापूर विरुद्ध नवी मुंबई अशी लढत झाली. कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील आणि मुंबईचा विशाल बनकर यांच्यात महाराष्ट्र केसरी किताबसाठी सामना रंगला.कोल्हापूरसाठी हे यश साधं नाही कारण तब्बल 21 वर्षांची ही मानाची गदा कोल्हापूरात गेली. हिंदकेसरी विनोद चौगुले यांच्यानंतर महाराष्ट्र केसरीची गदा पटकावणारा पृथ्वीराज पाटील आहे तरी कोण जाणून घेऊयात...

Category

🗞
News

Recommended