शरद पवार महाराष्ट्रात सर्वाधिक काळ सत्तेत राहिले असले तरी एक असं खातं आहे, जे त्यांच्या पक्षाला नेहमीच अडचणीत आणत आलंय. या खात्याचं नाव गृहमंत्रालय आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादी बहुतांश काळ काँग्रेससोबत राहिली, यात गृहमंत्रालय हे सर्वात दमदार खातं कायम पवारांनी आपल्याकडे ठेवलं. पण अशा काही घटना घडल्या, ज्यानंतर गृहमंत्र्याला एकतर राजीनामा द्यावा लागला, किंवा त्या घनटेने राज्य ढवळून निघालं. मग यात बाळासाहेबांची अटक असो, किंवा अलिकडेच पवारांच्या घरावर झालेला हल्ला... अशाच राष्ट्रवादीकडे गृहमंत्रालय असतानाच्या पाच घटना या व्हिडीओत समजून घेऊ...
Category
🗞
News