''ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एका क्षणात सत्तेचं चित्र पालटवलं. मी पुन्हा येईनचा गजर करणारे फक्त पाहत बसले", असा टोला पूर्वाश्रमीचे भाजप नेते आणि सध्या राष्ट्रवादीचे असलेले नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. "आपण पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ, असं त्यांना वाटत होतं, पण त्यांचा पुरता भ्रमनिरास झाला", असंही खडसे म्हणाले. "मी पुन्हा येईन म्हणत राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा पुन्हा आपल्यावरच येईन, असं काही जणांना वाटत होतं. राज्यात कुणाचंही आव्हान नाही. समोर कुणी पैलवानच दिसत नाही, असंही काहीजण म्हणत होते. पण तेल लावलेल्या पैलवानासमोर पुन्हा येईन म्हणणारे फक्त पाहत बसले," असा सणसणीत टोला खडसेंनी फडणवीस यांना लगावला. ते राष्ट्रवादीच्या संवाद मेळाव्यात बोलत होते.
Category
🗞
News