उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला गाड्यांचा ताफा थांबवून अपघातग्रस्तांना मदत केली. बारामतीला जात असताना माळेगाव कॉलनी येथे हा अपघात झाला होता. उपमुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून माहिती घेत उपचारासंबंधी सूचना दिल्या. अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनातून अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल केले गेले. अजित पवार आज विविध विकासकामांच्या उद्धाटनासाठी बारामती दौऱ्यावर होते.
Category
🗞
News