आंतरराष्ट्रीय विमानतळाची कोंडी कधी सुटणार? हवाई वाहतूक तज्ज्ञाचं सखोल स्पष्टीकरण

  • 3 years ago
शिक्षणाचे माहेरघर, आयटी क्षेत्राचे हब असलेले पुणे शहर आता राज्यातले सर्वात मोठं शहर बनलंय. अश्या या प्रसिद्ध शहरात अजूनपर्यंत आंतराष्ट्रीय विमानतळ नाही ही पुण्याची शोकांतिकाच म्हणावी लागेल. 2005 मध्ये पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाचा निर्णय झाला. 2010 मध्ये ठरले की विमानतळ चाकण येथे होणारा 2015 मध्ये पुरंदर येथे आंतराष्ट्रीय विमानतळाची जागा ठरवण्यात आली पण 2021 मध्ये पुन्हा आंतराष्ट्रीय विमानतळाच्या जागेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लोहगाव येथे असलेल्या विमानतळाची क्षमता इतकी मोठी नसल्यामुळे लोहगाव येथील विमानतळ आंतराष्ट्रीय होणे शक्य नाही. आता नेमक्या अडचणी कुठे येत आहेत हे महाराष्ट्र टाइम्स शी बोलताना हवाई वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी सांगितले आहे.

Recommended