'या' जिल्ह्यातील शाळा सोमवारपासून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज

  • 2 years ago
राज्य सरकारच्या आदेशावरुन येत्या सोमवारपासून शाळा सुरू होणार आहेत. राज्यातील पहिली ते 12वी पर्यंतच्या ग्रामीण भागातील शाळा सुरु होणार आहेत. त्यामुळे जळगाव जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग शाळा सुरु करण्यासाठी सुसज्ज झालंय. गेल्या 20 महिन्यांपासून कुलूपबंद असलेल्या शाळा गेल्या वर्षी 4 ऑक्टोबर 2021 रोजी उघडल्या होत्या. मात्र ओमायक्रॉनच्या आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 21 डिसेंबर रोजी शाळा बंद करण्यात आल्या. शाळा पुन्हा सुरु होत असल्याने आता सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लसीकरण बंधनकारक असणार आहे. जळगावात ज्या गावात सक्रिय रुग्णांची संख्या दहापेक्षा कमी आहे. त्या ठिकाणच्या शाळा सुरु करण्यास परवानगी दिलीये. शाळा सुरु होणार असल्या तरी शाळेत कोणत्याही खेळाच्या स्पर्धा किंवा सांस्कृतिक कार्यक्रम घेता येणार नाहीत. दरम्यान १५ ते १७ वयोगटातील सर्व पात्र विद्यार्थ्यांचे लसीकरण आठ दिवसांमध्ये करुन घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Recommended