सोनल चौहान ते कनिका कपूरपर्यंत मुंबई एअरपोर्टवर दिसला या सेलिब्रिटींचा जलवा

  • 3 years ago
हॉट अँड ब्युटीफूल अभिनेत्री सोनल चौहान विमानतळावर स्पॉट झाली. सोनलनं आपल्या करिअरची सुरुवात हिमेश रेशमिया यांच्या 'आप का सूरूर' या गाण्यातून केली होती. 2008 मध्ये सोनलने जन्नत या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला तसेच इमरान हाश्मीसोबत मुख्य भूमिकेत दिसली. बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर याची पत्नी मीरा राजपूतला देखील विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. मीरा राजपूत फिल्म इंडस्ट्री पासून दूर आहे. तरीही ती तीच्या सौंदर्य आणि व्यक्तिमत्वामुळे नेहमचीच चर्चेत असते. बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचे प्रसिद्ध गाणे ‘बेबी डॉल’ फेम गायिका कनिका कपूर देखील नेहमीच चर्चेत असते. यावेळी कनिका एअरपोर्टवर स्पॉट झाली. कणिकाने वयाच्या आठव्या वर्षापासून संगीत शिकण्यास सुरुवात केली. दरम्यान अभिनेता आणि मॉडेल असिम रियाजचा भाऊ उमर रियाज सुद्धा एअरपोर्टवर स्पॉट झाला. उमर रियाज एक उत्तम मॉडेल, अभिनेता, निर्माता, आणि डॉक्टर आहे. त्यानेसुद्धा कमी वेळात लोकप्रियता मिळवली.

Recommended