नानांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात १० मार्चनंतर राजकीय भूकंप? म्हणाले...

  • 2 years ago
नेत्यांवर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप, मंत्र्यांची तुरुंगवारी आणि सत्तापालटाची टांगती तलवार असलेल्या महाविकासआघाडी सरकारकडून लवकरच निर्णायक पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. महाविकासआघाडी सरकारकडून पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळात मोठे बदल केले जाऊ शकतात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तसे संकेत दिले आहेत. नाना पटोले नुकतेच दिल्लीत जाऊन काँग्रेस हायकमांडला भेटले होते. एका कार्यक्रमात बोलताना नाना पटोले यांनी म्हटले की, १० मार्चनंतर सरकार दुरूस्त होणार. माझी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली आहे. लवकरच राज्य सरकारमध्ये बदल दिसतील. पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर हे बदल होतील. सध्या राज्यात जे काही सगळं सुरु आहे, ते लवकरच दुरुस्त करायचे आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले. त्यामुळे आता राज्याच्या मंत्रिमंडळात खांदेपालट कधी होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Recommended