जळगाव तालुक्यातील ग्रामीण मतदार संघ हा मंत्री गुलाबराव पाटील यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागतेय. पाणीटंचाई दूर करावी तसेच पाण्याची पर्यायी योजना उपलब्ध करावी अशी नागरिकांची मागणी आहे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महिलां नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. महिलांनी डोक्यावर हंडा घेऊन सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करुनसुद्धा उपाययोजना करण्यात आलेली नाही. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून ग्रामीण मतदार नागरिकांना पाण्याच्या सुविधांपासून वंचित आहेत. पाणीपुरवठा मंत्र्यांच्याच मतदारसंघात नागरिक पाण्याच्या सुविधेपासून वंचित आहेत. महाराष्ट्रतील इतर ग्रामीण जिल्ह्यांचे काय? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
Category
🗞
News