• 3 years ago
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी रायगड जिल्ह्यात दोन दिवसीय आंदोलन पुकारले आहे. जिल्ह्यात आज आणि उद्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे. यात संपात रायगड जिल्ह्यातील १० हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी तसेच शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच समन्वय समिती रायगड शाखेच्या माध्यमातून या संपात विविध कर्मचारी सहभागी झाले आहेत. या आंदोलनातील मागण्याचे निवेदन पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि तहसिलदार यांना दिले आहे. नोकरभरती, जुनी पेन्शन योजना आणि निवृत्तीचं वय वाढवण्याची मागणी या आंदोलनातर्फे केली आहे. सर्वांना किमान वेतन देऊन कंत्राटी आणि योजना सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी कायम राहावी.

Category

🗞
News

Recommended