राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते, राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे. अटकेनंतर मलिक यांनी ईडीने कोर्टात हजर केले आहे. मलिक यांना जामीन मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ मुंबईतील कुर्ला येथे त्यांच्या घराबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी सुरू केली आहे. लगा लेना इडी से लेकर सीबीआय तक का जोर लडेंगे भी जितेंगे भी अशा मजकुराचे बॅनर घराबाहेर लावण्यात आले आहेत.
Category
🗞
News