परभणी जिल्ह्यातील मंगरूळ तांडा येथे सकाळी पहाटेच्या सुमारास सहा घरांना आग लागल्याची घटना घडली. या आगीत घरातील अत्यावश्यक साहित्य जळून खाक झाले असून सुदैवानं जिवीतहानी झालेली नाही. आगीत घरातील धान्य, शेळींची पिल्ले तसेच वीस हजार रुपयांसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. जिल्ह्यातील मंगरूळ तांडा येथील गोविंद रामदास आडे, विजय गोविंद आडे, राजू गोविंद आडे, भुजंग बाबुराव चव्हाण, गजानन भुजंग चव्हाण, शेषेराव शिवाजी राठोड यांची घरे जळाली आहेत. आगीची घटना घडताच घरातील महिला व नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या आगीच्या घटनेची माहिती जिंतूरचे तहसीलदार तसेच पोलीस प्रशासनाला देण्यात आली आहे. महसूल विभागातील तलाठी होळ यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून नागरिकांना मदतीची अपेक्षा आहे.
Category
🗞
News