छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा झाला. परंतु घरात नेमका कसा वाढदिवस साजरा केला याबाबत सर्वानाच उत्सुकता होती. आज उदयनराजेंच्या वाढदिवसानिमीत्त जलमंदीर पॅलेस येथे त्यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले यांनी त्यांचं औक्षण केलं. यावेळी उदयनराजेंच्या कपाळावर थोडा घाम आला होता. औक्षण झाल्यावर कल्पनाराजेंनी आईच्या मायेने त्यांचा घाम पुसला. शेवटी आई ही छत्रपतींची असो किंवा सामान्य जनतेची. आई ही आईच असते हे याक्षणी दिसून आले.
Category
🎵
Music