• 3 years ago
ठाकरे सरकारने नील सोमय्या यांच्याविरुद्ध अजूनही गुन्हा दाखल केला नाही. मग संजय राऊत यांचे दोन ट्रक पुरावे गेले कुठे असा टोला किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला मारला आहे. नील सोमय्या यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. ठाकरे सरकारला नीलला रात्री दोन वाजता जाऊन पकडायचं होतं परंतु त्याआधीच आम्ही आमची कागदपत्रे सादर केली आणि आमची कुठेही चूक केलेली नाही हे दाखवून दिलं. अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी दिली.

Category

🗞
News

Recommended