युक्रेनमध्ये अडकलेले 219 विद्यार्थी भारतात नुकतेच परतले आहेत. रोमानियाहून एअर इंडियाचं पहिलं विमान आज मुंबई विमानतळावर दाखल झालं. केंद्रीय मंत्री पियूष गोयल, मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. विद्यार्थी विमानतळावर दाखल होताच भाजपा-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने पाहायला मिळाले. भाजपा-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विमानतळावर जोरदार घोषणाबाजी करताना दिसले. यावेळी विद्यार्थ्यांचं स्वागत सोडून भाजप-राष्ट्रवादीत श्रेयवादासाठी रस्सीखेच पाहायला मिळाली.
Category
🗞
News