रशिया-युक्रेनचे युद्ध सुरु असताना युक्रेनमध्ये हजारो भारतीय नागरिक आणि विद्यार्थी अडकले आहे. यात देवळाच्या उमराणे येथील दिशा देवरे ही विद्यार्थिनी सुद्धा युक्रेनमध्ये अडकली आहे. दिशा दीड वर्षापूर्वी एमबीबीएस शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला गेली आहे. मागील वर्षी जून-जुलै महिन्यात दीड महिना करोनामुळे ती मायदेशी आली होती. दुसऱ्या वर्षाच्या शिक्षणासाठी पुन्हा झेप्रोझिया स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी युक्रेन येथे ती गेली. आता युद्द सुरु असल्याने ती युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती तिने व्हिडीओ कॉलद्वारे दिली आहे. आम्हाला लवकरात लवकर मायदेशी परत आणावे, असे ती गंभीर परिस्थिती सांगताना म्हणाली. भारत सरकारने त्वरीत सर्व विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणावे, अशी मागणी तिच्या बाबांनी केली.
Category
🗞
News