• 3 years ago
गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीत शिवसेना-भाजप मध्ये राजकीय वाद सुरू झाला आहे. दोन्ही पक्षांनी बॅनरबाजी करत, पत्रकार परिषद घेत आरोप-प्रत्यारोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेना आणि भाजपचा चांगलाच समाचार घेतला. गेल्यावेळी निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांच्या घशात हात घालून दात काढत होते, आता अजून काय काढत बसतील. तूर्तास ते एकमेकांचे कपडे फाडत आहे. शिवसेना-भाजप पक्ष हे दोघेही अपयशी ठरलेले आहेत. आता निवडणूकीपूर्वी आपल्याकडे लक्ष कसे वेधता येईल, यासाठी ते भांडत आहेत. परंतु सत्य हे आहे की शहरासाठी या दोन्ही पक्षांनी काहीच केलेलं नाही, अता एकमेकांवर आरोप करतायत. लोक सुज्ञ आहेत, यावेळेस तरी विचार करतील, असे राजू पाटील यांनी म्हटले.

Category

🗞
News

Recommended