शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेले विद्यार्थी संकटात सापडले आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील अयोध्या नगर येथील डॉ. सौरभ पाटील हा विद्यार्थी सुद्धा युक्रेनमध्ये अडकला आहे. डॉ. सौरभ पाटील हा एमएसच्या शिक्षणासाठी युक्रेनला गेला आहे. युक्रेनच्या राजधानी असलेल्या किव्ह शहरातील एका होस्टेलमध्ये तो राहतो. तीन दिवसांपासून त्याला प्रशासनाकडून कोणताही प्रत्यक्ष मदत मिळाली नाही. लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी त्याने भारत सरकारकडे आता मदत मागीतली आहे.
Category
🗞
News